ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ ऑर्डर करणे आता आणखी सोपे होणार आहे. आयआरसीटीसीने ई-कॅटरिंग पोर्टलद्वारे प्री-ऑर्डर अन्न वितरणासाठी झोमॅटोशी करार केला आहे. पहिल्या टप्प्यात, आयआरसीटीसीने पाच ठिकाणी अन्न वितरणाची घोषणा केली आहे. यामध्ये नवी दिल्ली, प्रयागराज, कानपूर, लखनौ आणि वाराणसी अशा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या ठिकाणी आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंग पोर्टलद्वारे प्री-ऑर्डर केलेले अन्न वितरीत केले जाईल. हळूहळू स्थानकांची संख्या वाढवली जाईल. (हेही वाचा: Mumbai: मुंबईमध्ये दोन महिन्यांत 137 हॉटेल्सना FDA कडून नोटीस; 15 भोजनालयांना काम थांबवण्याच्या सूचना)
IRCTC ties up with #Zomato for delivery of #preordered meals through #IRCTC’s e-catering portal (as a Proof of Concept) in the first phase at five Railway stations i.e. New Delhi, Prayagraj, Kanpur, Lucknow & Varanasi. pic.twitter.com/wgsyeOlvYT
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) October 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)