देश कितीही पुढारला असला तरी कित्येक दुर्गम भागात अजुनही प्राथमिक उपचार सेवा उपलब्ध नाही. अनेकदा या प्रकारच्या घटना कानावर पडतात. पण झारखंड मधील आरोग्य व्यवस्थेचा बिकट प्रश्न चव्हाट्यावर आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. तरी यात रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाच्या खाटेला खाद्यांवर धरुन रुग्णांच्या नातेवाईकांनी ५ किमी पायपिट करत रुग्णालयात दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तरी या व्हायरल व्हिडीओ नंतर झारखंड राज्य सरकारला या अपुऱ्या आरोग्य सेवेबाबत विविध प्रस्न विचारण्यात येत आहे.
देखिए झारखंड के स्वास्थ्य व्यवस्था की बदहाली, 5 किलोमीटर कंधे पर खाट ढोकर अस्पताल पहुंचा मरीज#ViralVideo pic.twitter.com/1ERY5ymKgT
— Priya singh (@priyarajputlive) December 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)