Vinesh Phogat, Bajrang Punia Join Congress: कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी (6 सप्टेंबर) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर हरियाणात विधानसभा निवडणूक लढवू शकतात. मात्र, निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य करणे टाळले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर विनेश फोगट म्हणाली, ‘मी संपूर्ण देशवासियांचे आभार मानू इच्छिते. मला तुमच्या अपेक्षा पूर्ण करू द्या. वाईट वेळी आम्हाला कळते की, आमचे कोण आहे, भाजप वगळता सर्व पक्ष आमच्यासोबत होते. रस्त्यांपासून संसदेपर्यंत महिलांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या पक्षात आता मी आहे. जी लढाई सुरु होती, ती चालू आहे. ती लढाई आम्ही नक्कीच जिंकू, आम्ही घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही.’

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतच्या पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, रेल्वेचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय रेल्वेने विनेश फोगटला व्हॉट्सॲपद्वारे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधींसोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या छायाचित्राबाबत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच विनेश आणि बजरंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होत आहे. (हेही वाचा: BJP Membership Campaign: भाजप सदस्यत्व मोहिमेने रचला इतिहास, 3 दिवसात 1 कोटीचा आकडा पार- विनोद तावडे)

विनेश फोगट व बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)