BJP Membership Campaign: भाजप सदस्यत्व मोहिमेने रचला इतिहास, 3 दिवसात 1 कोटीचा आकडा पार- विनोद तावडे
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाचे समन्वयक विनोद तावडे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाने इतिहास रचला असून अवघ्या १५ दिवसांत १ कोटीचा आकडा पार केल्याचा दावा केला आहे. विनोद तावडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हणाले, "भाजप सदस्यत्व मोहिमेने इतिहास रचला, 3 दिवसात 1 कोटीचा आकडा पार केला." तावडे पुढे म्हणाले, "2 सप्टेंबरपासून सुरू झालेला संघ पर्व सदस्यत्व अभियान-2024 मध्ये अवघ्या 3 दिवसांत 1 कोटींहून अधिक सदस्य सामील झाले आहेत, हा एक विक्रमच आहे.
येथे पोस्ट पहा:
भाजपा सदस्यता अभियान ने रचा इतिहास,
3 दिन में 1 करोड़ का हुआ आँकड़ा पार
2 सितंबर को शुरू हुए संगठन पर्व सदस्यता अभियान 2024 में मात्र 3 दिनों में ही 1 करोड़ से अधिक सदस्य जुड़े हैं, जो कि अपने आप में एक कीर्तिमान है। इस अभियान को लेकर देशवासियों व कार्यकर्ताओं में गजब का उत्साह… pic.twitter.com/joop1HkrM9
— Vinod Tawde (@TawdeVinod) September 5, 2024
भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचे नविनीकरण केले. नड्डा यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. त्यासोबत त्यांनी लिहिले की, "भारतीय जनता पार्टी-राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाअंतर्गत सदस्यत्वाच्या नविनीकरणाची प्रत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आम्हा सर्वांचे जेष्ठ असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी दिली.
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2024 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

