मणिपूर मुद्यावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जोरदार हंगामा पाहायला मिळत आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्री गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आज मी लोकसभेचे अधीर चौधरी आणि राज्यसभेचे मल्लिकार्जुन खरगे या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून मणिपूरच्या मुद्द्यावरील चर्चेत अमूल्य सहकार्याचे आवाहन केले आहे. सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे आणि सर्व पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी आशा आहे की सर्व पक्ष या महत्त्वाच्या मुद्द्यावर पुन्हा सहकार्य करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)