बालासोर रेल्वे दुर्घटनेला दोन महिनेही उलटले नाहीत, तोच आता अजून एक रेल्वे रुळावरुन घसरल्याची बातमी येत आहे. तिरुपती-तिरुअनंतपुरम ट्रेनचा डब्बा शेवटच्या थांब्यावर रुळावरून घसरला. अपघाताशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. तिरुपती-तिरुवनंतपुरम ट्रेन रुळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र रुळावरून घसरलेल्या डब्यात एकही प्रवासी उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. सध्या प्रशासनाकडून रुळावरून घसरलेला डबा हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. (हेही वाचा: Video: हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटी; काश्मीरमध्ये भूस्खलनात 8 ठार)
►తిరుపతి : రైల్వే స్టేషన్ లో పట్టాలు తప్పిన తిరుపతి - తిరువనంతపురం ట్రైన్ చివరి బోగి
►ట్రైన్ కు ప్రయాణికులు లేని భోగిని అటాచ్ చేసే క్రమం చోటు చేసుకున్న ఘటన
►వెంటనే గుర్తించి బోగీని పట్టాల పైకెక్కించిన రైల్వే సిబ్బంది pic.twitter.com/4O9nZ3aJgV
— DD News Andhra (అధికారిక ఖాతా) (@DDNewsAndhra) July 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)