रेल्वे सुरक्षा विशेष दलाचा एक जवान दोन महिलांसाठी जीवनदूत ठरला आहे. सूरत रल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवावर बेतू शकेल असा धाडसी प्रयत्न करत असलेल्या महिला अयशस्वी ठरल्या. पाय घसरुन त्या फलाट आणि रेल्वेच्या रिकाम्या जागेत अडकून ट्रेनखाली येणार इतक्यात हा जवान मदतीला धावून आला. त्याने विद्यूतवेगाने दोन्ही महिलांना बाजूला खेचले. ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. अरविंद कुमार असे या जवानाचे नाव आहे. त्याच्या धाडसाचा आणि मदतीचा थरार दाखवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)