महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. कोरोनामुळे एमपीएससीची परीक्षा झाली नव्हती. यावेळी अनेक विद्यार्थ्यांच वय संपुष्टात आले होते. विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी वयोमर्यादा वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता अशा विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)