कुवेत राज्याचे अमीर महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे (Sheikh Nawaf Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah) 16 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत शोक आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या सन्मानार्थ, भारत सरकारने 17 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो, तो अर्ध्यापर्यंत खाली घेण्यात येणार आहे आणि त्या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत.

कुवैत शेख नवाफ यांचे 16 डिसेंबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. आपला सावत्र भाऊ शेख सबाह अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या मृत्यूनंतर शेख नवाफ यांनी सप्टेंबर 2020 मध्ये सत्ता हाती घेतली होती. शेख नवाफ यांच्या निधनानंतर त्यांचे 83 वर्षीय सावत्र भाऊ शेख मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह हे कुवेतचे नवे शासक असतील. (हेही वाचा: ब्राझिलियन गॉस्पेल गायक Pedro Henrique चे हृदयविकाराचा झटक्याने निधन; स्टेजवरच गाताना कोसळला (Watch)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)