Video- Singer Dies During Live Performance: ब्राझिलियन गॉस्पेल गायक Pedro Henrique चे हृदयविकाराचा झटक्याने निधन; स्टेजवरच गाताना कोसळला (Watch)

पेड्रो हेन्रिक हा त्याच्या दमदार आवाजासाठी ओळखला जायचा. तो गॉस्पेल संगीतामधील एक उगवता तारा होता.

Video- Singer Dies During Live Performance: ब्राझिलियन गॉस्पेल गायक Pedro Henrique चे हृदयविकाराचा झटक्याने निधन; स्टेजवरच गाताना कोसळला (Watch)
Pedro Henrique

Singer Dies During Live Performance: ब्राझीलमधून एका गायकाच्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फेरा डी सांताना, बहिया येथे 30 वर्षीय गॉस्पेल गायक पेड्रो हेन्रिक याचे एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले. या प्रतिभावान कलाकाराला स्टेजवर गाताना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्याचा मृत्य झाला. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पेड्रो हेन्रिक हा त्याच्या दमदार आवाजासाठी ओळखला जायचा. तो गॉस्पेल संगीतामधील एक उगवता तारा होता. त्याच्या मागे त्याचे कुटुंब, पत्नी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. पेड्रो हेन्रिकचे बाहिया येथे अंत्यसंस्कार केले जातील. त्याची मुलगी 19 तारखेला तिच्या आयुष्याचा दुसरा महिना साजरा करणार होती. पेड्रो हेन्रिकच्या जाण्याने त्याचे सहकारी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा: Shreyas Talpade Gets Heart Attack: लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; झाली अँजिओप्लास्टी- Reports)

पहा व्हिडिओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 12:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).