कर्नाटक उच्च न्यायालयाने एका महिलेच्या मृतदेहावर झालेले लैंगिक अत्याचार हा भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही, असे म्हटले आहे. एका 21 वर्षीय मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केलीझ  आहे. मात्र त्याला हत्येच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आले. न्यायमूर्ती बी वीरप्पा आणि न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक टी यांच्या खंडपीठाने दोषी रंगराजू उर्फ ​​वाजपेयी याने दाखल केलेल्या अपीलला अंशत: परवानगी दिली. न्यायालयाने त्याची हत्येची शिक्षा कायम ठेवली आणि ट्रायल कोर्टाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. सध्याच्या बलात्काराच्या तरतुदीमध्ये मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवण्याचे कलम नाही.

भारतीय दंड संहितेच्या कलम 375 आणि 377 च्या तरतुदींचे काळजीपूर्वक वाचन केल्यास हे स्पष्ट होते की, मृत शरीराला माणूस किंवा व्यक्ती म्हणता येणार नाही व त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 375 किंवा 377 च्या तरतुदी तिथे लागू होणार नाहीत. आता कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्राला भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे, यासह मृतदेहांसोबत घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना गुन्हेगार ठरवण्यासाठी आणि शिक्षा करण्यासाठी नवीन तरतुदी आणण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: Rajasthan Shocker: व्यक्तीने वृद्ध महिलेची हत्या करून खाल्ले तिचे मांस; आता रुग्णालयात झाला मृत्यू, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)