कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना आता सीट बेल्ट लावणे अनिवार्य असणार आहे. सीट बेल्ट न लावता पकडल्यास दंडही भरावा लागेल. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. या अहवालानुसार येत्या तीन दिवसांत यासंदर्भात आदेश जारी केला जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, ‘याआधी फक्त ड्रायव्हर आणि सहप्रवाशांसाठी सीट बेल्ट न लावल्यास दंड होता, परंतु आम्ही मागील सीटच्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट लावाने अनिवार्य करणार आहोत.’ सायरस मिस्त्री यांचा मुंबईजवळ कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. गाडीत सीट बेल्ट न लावणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)