रामनवमीच्या मुहूर्तावर होणारी गर्दी आणि साजरा केला जाणारा उत्सव या पार्श्वभूमीवर श्री राम मंदिर ट्रस्टने मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. ज्यामध्ये राम लल्लाच्या दर्शनासाठी व्हीआयपींच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अधिसूचनेनुसार 15 ते 18 एप्रिल या नवरात्रीच्या चार दिवसांसाठी VIP दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रामनवमीला भाविकांना इतरही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. राम मंदिर ट्रस्टने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. जे आपल्या अधिकृत X हँडलवर पस्टद्वारे प्रसिद्धीसही दिली आहे. (हेही वाचा, Ram Navami 2024: रामनवमी निमित्त रामललांना चांदी आणि सोन्याची वस्त्र, सूर्य देव स्वतः करणार अभिषेक)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)