अयोद्धेमध्ये काल राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हा क्षण अनेक रामभक्तांना भावनिक करणारा होता. दरम्यान मोजक्याच आमंत्रितांमध्ये कलाकारांचाही समावेश होता. या सोहळ्याला अभिनेते Jackie Shroff अनवाणी पोहचल्याची बाब समोर आली आहे. अभिनेता विवेक ऑबेरॉय ने जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचा व्हिडिओ शेअर करत ही लहानशी पण सध्या वायरल होत असलेली बाब रसिकांसोबत शेअर केली आहे. 'स्वच्छ मंदिर अभियाना'मध्येही जॅकी श्रॉफ यांनी सहभाग घेत मुंबईत मंदिरामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे साफसफाई केल्याचं समोर आलं होते. त्या व्हिडिओचीही मोठी चर्चा रंगली होती.
पहा फोटोज
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/01/jaggu-dada.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/01/Jacky.jpg)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)