Leader of the Opposition In The Lok Sabha: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या जनादेशानंतर, काँग्रेस सलग तिसऱ्यांदा केंद्रातील सत्तेपासून दूर गेली असेल, परंतु यावेळी ती गेल्या दोन वेळापेक्षा अधिक मजबूत झाली आहे. आता काँग्रेसची भविष्यातील रणनीती काय असेल यासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) विस्तारित बैठक शनिवारी नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निर्णयाबद्दल जनतेचे आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले गेले. तसेच, कार्यकारिणी सदस्यांनी लोकसभेत राहुल गांधी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. कार्यकारिणीनुसार, संसदेत नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी सर्वात योग्य व्यक्ती आहेत. याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्या नावाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे. (हेही वाचा: Congress Denies JDU Claims: नीतीश कुमार यांनी विरोधी INDIA आघाडीकडून पंतप्रधानपदाची ऑफर नाकारली- जदयु नेत्याचा दावा)
पहा पोस्ट-
#WATCH | Delhi: After the CWC meeting, Congress leader Ajay Rai says, "It was the CWC's wish that Rahul Gandhi be made the LoP and be the voice of the common man and raise their issues in the Parliament... We are working on why we got fewer seats in some states. Their claim of… pic.twitter.com/wfiOUlw08d
— ANI (@ANI) June 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)