Leader of Opposition in Lok Sabha: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर सरकार स्थापन झाले. यानंतर सभागृहात विरोधी पक्षनेते कोण होणार यावर सतत चर्चा सुरू होती. आता या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला असून, उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेस पक्षाने ही घोषणा केली. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी माहिती दिली आहे.

राहुल गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच घटनात्मक पद भूषवणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा जागा लढवल्या होत्या आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या, पण निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधींनी वायनाड लोकसभा जागा सोडली. (हेही वाचा: Rahul Gandhi: संविधान हातात घेऊन राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ, भाजपच्या खासदारांनी दिला 'जय श्री राम'चा नारा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)