भारताकडून आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून घेण्यात आला आहे. दहशतवादी तळांना लक्ष्य करत भारताने आज त्यांच्यावर हल्ला केला आहे. या कामगिरीबद्दल भारतीय नागरिकांनी सैन्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी याबद्दल सैन्याचं कौतुक करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये शरद पवार, मलिक्कार्जुन खर्गे, राहुल गांधी, अजय माकन सह असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे. तर सामान्य नागरिकांनी फटाके फोडून, भारताचा झेंडा फडकवत या बदल्याचा आनंद देखील साजरा केल्याचं पहायला मिळालं आहे. Operation Sindoor ने भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये कोणत्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं? पहा यादी .

शरद पवार

राहुल गांधी

मल्लिकार्जुन खर्गे

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

नागरिकांचं सेलिब्रेशन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)