पुणे येथील औंध रोड परिसरात एका व्यक्तीने राडा केला. या व्यक्तीने एका बंगळुरु स्थित जोडप्याला शिवीगाळ केल्याचा आणि जोडप्यातील महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. शिवाय जोडप्याकडे असलेल्या कारचेही नुकसान या व्यक्तीने केली. सुजित काटे असे या व्यक्तीचे नाव आहे. पीडित जोडप्याने दिलेल्या तक्रारीवरुन चतु:श्रंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चतु:श्रुंगी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते. आरोपीने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  (हेही वाचा -Pune Fire: पुण्यातील आयटी पार्कच्या इमारतीला भीषण आग, अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)