संसदेतून विरोधी पक्षातील खासदारांचे सुरू असलेल्या निलंबनावरून सध्या विरोधक पेटले आहेत. अशामध्ये काल टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरामध्येच पायर्‍यांवर उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल केली. यावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. 'निवडून आलेले प्रतिनिधी स्वत:ला अभिव्यक्त करण्यास स्वतंत्र आहेत, परंतु त्यांची अभिव्यक्ती सन्मान आणि सौजन्याच्या निकषांमध्ये असावी. हीच संसदेची परंपरा आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भारतातील लोक ते कायम राखतील अशी अपेक्षा ठेवतात.' PM Modi Expressed Pain: संसदेच्या आवारात उपराष्ट्रपतींची नक्कल करणे हे घृणास्पद, पंतप्रधानांनी फोन करुन व्यक्त केली खंत .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)