Prajwal Revanna Case: कर्नाटकातील कथिक सेक्स टेप प्रकरणातील मुख्य आरोपी जेडीएस खासदार प्रज्वल रेवन्नाचे वडील जेडीएस आमदार एचडी रेवन्ना याला 5 मे रोजी अटक करण्यात आली होती. आता रेवन्नाला 14 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना आज भारतामध्ये परतण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी प्रज्वल रेवन्ना आणि एचडी रेवन्ना प्रकरणांवर बंगळुरूमध्ये नेते, पक्ष कार्यकर्ते आणि आमदारांची एक मोठी बैठक घेतली. जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी यांनी बुधवारी पुनरुच्चार केला होता की, ते त्यांचा भाऊ एचडी रेवन्ना याच्या पाठीशी उभे राहतील, मात्र त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवन्नाला कायद्याच्या कारवाईचा सामना करावा लागेल. कुमारस्वामी यांनी दावा केला होता की, त्यांचा पुतण्या प्रज्ज्वल रेवन्नाच्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह निवडणुकीपूर्वी वितरित केले होते. या पेन ड्राईव्हचे वाटप पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते आणि पोलीस कर्मचाऱ्यांना हे करण्याची धमकी देण्यात आली.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)