राम नवमी निमित्त आज अयोध्येच्या राम मंदिरामध्ये राम लल्ला च्या मूर्तीवर सूर्य अभिषेक झाला. सूर्य तिलक कपाळावर आल्याचा क्षण मोहक होता. अनेकांनी या क्षणाचा अनुभव ऑनलाईन घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्याला अपवाद नाहीत. मोदींनी देखील असाम मध्ये प्रचार रॅली दरम्यान हा क्षण ऑनलाईन प्रवासातच पाहिला. X वर पोस्ट करत त्यांनी हा क्षण आपल्यासाठी करोडो भारतीयांप्रमाणे भावूक करणारा होता असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Surya Tilak Ayodhya Ram Mandir 2024: राम नवमी दिवशी रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्य किरणांचा अभिषेक; पहा हा खास क्षण (Watch Video).
पहा ट्वीट
After my Nalbari rally, I watched the Surya Tilak on Ram Lalla. Like crores of Indians, this is a very emotional moment for me. The grand Ram Navami in Ayodhya is historic. May this Surya Tilak bring energy to our lives and may it inspire our nation to scale new heights of glory. pic.twitter.com/QqDpwOzsTP
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)