Pilot Dalip Singh Majithia Passes Away: भारतीय हवाई दलातील सर्वात वयोवृद्ध लढाऊ वैमानिक स्क्वाड्रन लीडर दलीप सिंह मजिठिया यांचे सोमवारी रात्री वयाच्या 103 व्या वर्षी उत्तराखंडमध्ये निधन झाले. अहवालानुसार, 27 जुलै 1920 रोजी जन्मलेल्या दलीप सिंग मजिठिया यांचा 100 वा वाढदिवस भारतीय हवाई दलाने 2020 मध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. दलीप सिंह मजिठिया यांचा जन्म शिमला येथील स्किपलिन व्हिला येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी दलीप सिंग यांनी अमृतसरमधील खालसा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि लाहोरमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्सचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेलेल्या दलीप सिंग यांना घोडेस्वारीची आवड होती, ज्यामुळे त्यांना घोडदळात लष्करात करिअर करण्याची संधी मिळाली. हवाई दलातील त्यांची कारकीर्द केवळ एक वर्ष टिकली आणि ते ऑगस्ट 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यासह निवृत्त झाले. पण त्यांची उड्डाणाची आवड 19 जानेवारी 1979 पर्यंत कायम राहिली आणि त्यांनी 13 वेगवेगळ्या विमानांवर 1100 तास उड्डाण करण्याचा विक्रम नोंदवला. (हेही वाचा: Boat Capsized in Jhelum River : झेलम नदीत बोट उलटल्याने 10 विद्यार्थ्यांसह अनेक जण नदीत बुडले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)