Boat Capsized in Jhelum River : झेलम नदीत बोट उलटल्याने 10 विद्यार्थ्यांसह अनेक जण नदीत बुडले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Photo Credit - x

Boat Capsized in Jhelum River : श्रीनगर(Srinagar)मधील गंडाबल येथे झेलम नदी(Jhelum River)त बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तेथे बचावकार्य सुरू आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेवेळी या बोटीत 10 शाळकरी (student)मुलांसह एकूण 20 जण होते. बोट उलटण्याचे(Boat Capsized) कारण अद्याप समोर आलेले नाही. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर सर्वजण बेपत्ता झाले होते. एसडीआरएफची टीम बचावकार्याला लागली आहे. (हेही वाचा:Bihar Accident: गावाला जाताना कारचा अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर )

मिळालेल्या माहितीनुसार, SDRF टीमने झेलम नदीतून 4 मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, तीन जणांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिका-यांनी सांगितले की 'बोटीत एकूण 20 जण होते. शोध मोहीम आणि बचावकार्य सुरू आहे', असे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीनगर भागात पाऊस सुरू आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झेलम नदीसह तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.