Bihar Accident: गावाला जाताना कारचा अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर
बेगुसराय येथे ही दुर्घटना घडली. होळीनिमित्त गावाकडे जात असताना कारचा अपघात झाला.
Bihar Accident: बिहार राज्यात ऐन होळीच्या सणात गावाला जाणाऱ्या कुटुंबियाचा कार अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राज्यातील बेगुसराय येथे ही दुर्घटना घडली. होळीनिमित्त गावाकडे जात असताना कारचा अपघात झाला. कार चालकाचे कारवरील नियत्रंण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- लेन बदलताना टँकर पलटी, 400 फूट दरीत कोसळला टेम्प; एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात;
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे अर्चना देवी यांचे कुटुंब कारने गावासाठी निघाले होते. दरम्यान बछवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमटियाजवळ आली असताना, कार चालकाने नियत्रंण सुटले. कार अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. कारमध्ये आठ जण होते. अपघातात आई आणि मुलीसोबत आणखी तीन जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघातात आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बछवारा परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चना देवी, नम्रता कुमारी, काजल कुमारी अशी मृतांची नावे आहे. तर सुधीर कुमार सिंग आणि त्यांचा मुलगा ओम कुमार आणि चालक अशी जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे. अर्चना देवी कुटुंबासोबत जमुई येथे होळीसाठी जात होत्या आणि वाटेत काळाने घात केला.
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2024 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

