बेंगळुरू पोलिसांनी आकासा एअर लाईन्समधील एका 56 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर फ्लाइटमध्ये बिडी ओढल्याचा आरोप आहे. प्रवीण कुमार असे आरोपीचे नाव आहे. आकासा एअरच्या विमानाने ते अहमदाबादहून बंगळुरूला जात होते. विमानात बिडी पेटवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी कुमार यांना केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (KIA) अटक केली. विमानतळावर उतरल्यानंतर एअरलाइन्सच्या ड्युटी मॅनेजरने केआयए पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

प्रवीण कुमार हे राजस्थानमधील मारवाड भागातील रहिवासी आहेत. एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सनी त्यांना टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना पकडले. नंतर त्यांची रवानगी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. येथे त्यांनी पोलिसांना सांगितले की, हा त्यांच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होता व त्यांना नियमांची माहिती नव्हती. (हेही वाचा: Go First Ticket Cancellation:गो फर्स्ट कडून रद्द झालेल्या फ्लाईट्सचे मिळणार रिफंड देण्यासाठी 'Ease My Claims' portal लॉन्च; पहा कसे मिळवाल तुमच्या तिकीटाचे पैसे परत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)