ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप किनार्‍याजवळ एका मासेमारी बोटीतून कॅमेरे आणि मायक्रोचिप सारखी उपकरणे बसवलेले कबूतर जप्त करण्यात आले, पोलिसांना संशय आहे की हा पक्षी हेरगिरीसाठी वापरला जात होता. काही दिवसांपूर्वी समुद्रात मासेमारी करताना काही मच्छिमारांना त्यांच्या ट्रॉलरवर बसलेले कबुतर दिसले. बुधवारी या पक्ष्याला पकडून सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जगतसिंगपूरचे पोलीस अधीक्षक राहुल पीआर यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांचे पशुवैद्य पक्ष्याचे परीक्षण करतील. त्याच्या पायांना जोडलेल्या उपकरणांची तपासणी करण्यासाठी राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची मदत घेतली जाणार आहे. पक्ष्याच्या पंखांवर स्थानिक पोलिसांना अज्ञात भाषेत काही लिखाण देखील दिसले आहे. हे काय लिहिले आहे ते शोधण्यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेतली जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)