Accident Caught on Camera in Hyderabad: हैद्राहादमधील सूर्यपेट रोडवर (Suryapet Road) 'मद्यधुंद' कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात (Accident) झाला. ज्यामुळे कार पार्क केलेल्या आठ दुचाकींवर आदळली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. तर इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही धक्कादायक घटना आज 17 फेब्रुवारी रोजी समोर आली. सुरुवातीच्या अहवालांवरून असे दिसून येते की अपघाताच्या वेळी चालक, एक तरुण, दारू पिऊन गाडी चालवत होता. या प्रकरणाची चौकशी अधिकारी करत आहेत. (चालत्या ट्रेन मध्ये चढताना प्रवाशाचा तोल गेला, RPF जवानाच्या मदतीने वाचला जीव ( Watch Video))

'मद्यधुंद' कार चालकाची 8 दुचाकींना धडक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)