मुलायम सिंह यादव यांचं पार्थिव आता गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटल मधून Saifai या मूळ गावी रवाना करण्यात आले आहे. सैफई मध्येच उद्या (11 ऑक्टोबर) अंत्यविधी संपन्न होणार असल्याची माहिती सपा कडून देण्यात आली आहे. दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांच्या अंत्यविधीला सैफई मध्ये उपस्थित राहणार आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप दिला जाईल असं जाहीर केले आहे. मेदांता मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुलायम सिंह यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे.
पहा ट्वीट
Mortal remains of veteran politician #MulayamSinghYadav being taken to Saifai, his ancestral village in Uttar Pradesh, from Gurugram's Medanta Hospital
His last rites will be held in Saifai on October 11. pic.twitter.com/DQwjIzqrWK
— ANI (@ANI) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)