गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यात गोबलेज गावात असलेल्या एका प्लॅस्टिक कंपनीला मोठी आग लागली आहे. भीषण आगीने रौद्र रुप धारण केले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारखान्यात प्लॅस्टीकचे प्रक्रिया केलेले आणि कच्ची सामग्री अधिक असल्याने आग आणखी भडकत आहे.

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीचे रौद्र रुप पाहता मोठी वित्त हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्तसंस्था एएनआयने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे. (हेही वाचा, Assam-Guwahati Accident: असमच्या गुवाहटीमध्ये भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू अनेक जखमी)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)