तुमच्या नावावर किती सीम कार्ड्स? याची माहिती मिळवण्यासाठी आता TAF-COP Portal वर तुम्हांला मदत मिळणार आहे. आधारकार्डच्या नंबरच्या मदतीने अनेक जणांनी बनावट कागदपत्रं वापरून सीम कार्ड विकत घेतली आहेत. पण आता यामध्ये तुमच्यानावावर देखील कोणी सीमकार्ड्स घेतली आहेत का? याची माहिती मिळणार आहे. tafcop.sancharsaathi.gov.in वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि कॅप्चा टाकून माहिती पाहता येणार आहे. तुमच्या Aadhaar Card वरुन इतर कोणी SIM घेतले आहे का? 'या' पद्धतीने घ्या जाणून .
पहा ट्वीट
तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहे हे तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकता.
TAFCOP या पोर्टलला अवश्य भेट द्या.https://t.co/WNdUn3ziT7 pic.twitter.com/fMZtDWov7X
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) May 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)