केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून एका भारतीय लष्कराच्या जवानाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या प्रतिबंधित संघटनेने हे अपहरण केले आहे. जवानाचे अपहरण करून कडककल येथील त्याच्या घराजवळील जंगलात त्याला नेल्यानंतर तिथे त्याच्यावर कथित हल्ला करण्यात आला. रविवारी, सहा जणांनी पिडीत जवानाला पकडले आणि जंगलात नेले. त्या ठिकाणी त्याचा छळ केला आणि त्याच्या पाठीवर पेंटने पीएफआय लिहिले. पाठीवर हिरव्या रंगात पीएफआय अशी अक्षरे कोरलेल्या जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भारतीय लष्कराच्या जवानाचा टी-शर्ट मागून फाटलेला आहे आणि त्याच्या पाठीवर पीएफआय अक्षरे हिरव्या रंगात लिहिली आहेत. (हेही वाचा: Bihar Shocker: माणुसकीला काळीमा! पटना येथे 1500 रुपयांच्या कर्जासाठी दलील महिलेला विवस्त्र करून मारहाण; चेहऱ्यावर केली लघवी)
#TimesNow accesses the FIR in Kollam Soldier attack case.
Army personnel Shine Kumar, in his complaint, said he was attacked by a group of six men. They tied up his hands with tape and wrote 'PFI' on his back with green paint...: @KeypadGuerilla shares details with @DEKAMEGHNA pic.twitter.com/EAUejYgwqP
— TIMES NOW (@TimesNow) September 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)