कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातून डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. येथे सिझेरियन प्रसूतीदरम्यान बाळाचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आल्याचा आरोप आहे. शुक्रवारी नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत आंदोलन केले. अहवालानुसार, 17 जून रोजी अमृता नावाच्या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमृताची सामान्य प्रसूती होऊ शकत नसल्याने डॉक्टरांनी सी-सेक्शन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलाचे पालक अर्जुन आणि अमृता यांनी आरोप केला आहे की, डॉक्टर निजामुद्दीन यांनी शस्त्रक्रियेदरम्यान नवजात बालकाचा प्रायव्हेट पार्ट कापला. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला. (हेही वाचा: UP Shocker: हापूरमध्ये डॉक्टरांचा गंभीर निष्काळजीपणा; अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान महिलेच्या पोटात सोडला कापूस आणि पट्टी, कुटुंबीयांची कारवाईची मागणी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)