कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका आश्रमात पेन चोरल्याप्रकरणी इयत्ता 3 वीच्या विद्यार्थ्याला 3 दिवस बंदिस्त करून, मारहाण आणि छळ करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकेच नाही तर, त्याला भीक मागण्यासाठी यादगीर रेल्वे स्थानकावर नेण्यात आले, पण पैसे न मिळाल्याने त्याला परत आश्रमात आणण्यात आले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण आश्रमात शनिवारी ही घटना घडली असून, तरुण कुमार (7) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. आश्रमाचा प्रभारी वेणुगोपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुण कुमारच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांची दोन मुले तरुण आणि अरुण आर्थिक अडचणींमुळे आश्रमात राहून अभ्यास करतात. ती कधी कधी दोघांना भेटायला आश्रमात जाते. जेव्हा ती नुकतीच आश्रमात मुलांना भेटायला गेली, तेव्हा तरुणच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यांच्या अंगावर सूज आणि डोळ्याखाली खोल जखमा होत्या. याबाबत विचारणा केली असता, अरुणने सांगितले की, एक साधा पेन चोरला म्हणून तरुण मारहाण करण्यात आली. त्यानंतर आईने पोलिसांत याबाबत तक्रार केली. बाल हक्क कार्यकर्ते सुदर्शन यांनी सांगितले की, मुलाची सुटका करण्यात आली असून हे प्रकरण महिला व बालकल्याण मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (हेही वाचा: Chhattisgarh HC on Schools Punishment: 'शिस्तीच्या नावाखाली मुलांवर होणारी शारीरिक हिंसा ही क्रूरताच'; छत्तीसगड उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)