Karnataka Election Result 2023: आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंचा भाजपाला टोला
भाजपा 'काँग्रेसमुक्त भारत' करू असं म्हणत आम्हाला चिडवत होता. मात्र, सत्य हे आहे की, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला आहे." असे खरगे यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला आहे. या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष (Congress national president) मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला केला. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजय मोठा आहे. या विजयाने संपूर्ण देशात एक नवी उर्जा निर्माण केली आहे. भाजपा 'काँग्रेसमुक्त भारत' करू असं म्हणत आम्हाला चिडवत होता. मात्र, सत्य हे आहे की, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला आहे." असे खरगे यांनी म्हटले आहे.
पहा ट्विट -
#KarnatakaElectionResults | It's a big victory. Through this, a new energy emerged in the whole nation. BJP used to taunt us and say that we'll make 'Congress mukt Bharat'. Now the truth is that it is 'BJP mukt south India': Congress national president Mallikarjun Kharge pic.twitter.com/R96Lriw60X
— ANI (@ANI) May 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

