Joe Biden Congratulates Narendra Modi: काल 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज भाजप आणि एनडीएमधील इतर पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एनडीए सलग तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात नरेंद्र मोदीदेखील तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएच्या या कामगिरीनंतर जगभरातील अनेक नेते मोदीने अभिनंदन करत आहेत. नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सोशल मिडियावर नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

बिडेन म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन. या ऐतिहासिक निवडणुकीत सुमारे 650 दशलक्ष मतदार सहभागी झाले त्यांचेही अभिनंदन. अमर्याद सामर्थ्याचे भविष्य सामायिक करत असताना आपल्या राष्ट्रांमधील मैत्री वाढत आहे.’ (हेही वाचा: World Leaders Congratulate Narendra Modi: आतापर्यंत 50 हून अधिक जागतिक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे केले अभिनंदन; 8 जूनला घेऊ शकतात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)