नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली. या सगळ्या घडामोडीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्या कार्यकाळासाठी हिंदीतून ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. केविन पीटरसनने ट्विट करून म्हटले आहे की, "भारताचे नेतृत्व करण्यासाठी आणखी एक कार्यकाळ मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदींचे खूप खूप अभिनंदन." मी जेव्हा-जेव्हा भारतात येतो, तेव्हा देश अधिक चांगला होत असतो. किती छान काम आहे सर! खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम.
भारत का नेतृत्व करने के लिए एक और कार्यकाल हासिल करने के लिए @narendramodi को बहुत-बहुत बधाई। मैं जब भी भारत आता हूँ, देश बेहतर से बेहतर होता जाता है। क्या शानदार काम है, सर!
शुभकामनाएँ और ढेर सारा प्यार.
— Kevin Pietersen🦏 (@KP24) June 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)