World Leaders Congratulate Narendra Modi: भाजपसाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल नक्कीच धक्कादायक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत. मात्र यावेळी भाजप अवघ्या 240 जागा मिळवू शकला असला तरी, एनडीएमधील इतर घटक पक्षांसोबत युती करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्ता स्थापन करू शकतात. सध्या याबाबत बैठकांचा दौरा सुरु आहे. अशात एनडीएच्या विजयाबाबत आतापर्यंत 50 हून अधिक जागतिक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. श्रीलंका, मालदीव, इराण, सेशेल्सच्या राष्ट्रपतींनी आणि नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार, मॉरिशसच्या पंतप्रधानांनी अभिनंदनपर शुभेच्छा पाठवल्या आहेत. G20 देशांपैकी इटली, जपान आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.
यासह आफ्रिका, नायजेरिया, केनिया, कोमोरोसच्या राष्ट्रपतींनी अभिनंदन संदेश पाठवले आहेत. कॅरिबियन, जमैका, बार्बाडोस, गयानाच्या नेत्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. दक्षिण पूर्व आशियातील सिंगापूर आणि मलेशियाच्या पंतप्रधानांनी मोदींचे अभिनंदन केले आहे. यासह अहवालानुसार, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपत घेण्यासाठी सज्ज आहेत. येत्या 8 जूनच्या संध्याकाळी त्यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो. (हेही वाचा: PM Modi Third Term: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार! या दिवशी होणार शपथ विधी सोहळा)
So far, over 50 world leaders have congratulated PM Narendra Modi on his third-term win. Presidents of Sri Lanka, Maldives, Iran, Seychelles & PMs of Nepal, Bangladesh, Bhutan, Myanmar, Mauritius have sent congratulatory greetings. Among G20 countries, PMs of Italy, Japan &…
— ANI (@ANI) June 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)