प्राप्तिकर विभागाने (Income-Tax Department) प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्यामध्ये वाढ नोंदवली आहे. मूल्यांकन वर्ष 2023-2024 साठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत 8.18 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2022 पर्यंत 7.51 कोटी आयटीआर दाखल झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचे हे प्रमाण 9 टक्के जास्त आहे. या कालावधीत दाखल केलेल्या लेखापरीक्षण अहवाल आणि इतर फॉर्मची एकूण संख्या 1.60 कोटी आहे, मागील वर्षाच्या याच कालावधीत 1.43 कोटी लेखापरीक्षण अहवाल आणि फॉर्म दाखल करण्यात आले होते. यामध्ये वार्षिक माहिती विवरण (AIS) सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, परिणामी आयटीआरची सुरळीत आणि जलद फाइलिंग झाली. तसेच या काळात ई-फाइलिंग हेल्पडेस्क टीमने 31 डिसेंबर 2023 पर्यंत करदात्यांच्या अंदाजे 27.37 लाख प्रश्न हाताळले. (हेही वाचा: Working Women Investment Scheme: नवीन वर्षापासून गुंतवणुकीचा विचार करताय का? नोकरदार महिलांसाठी 'या' आहेत सर्वोत्तम गुंतवणूक योजना; भांडवलाच्या सुरक्षेसह मिळेल चांगला परतावा)
Record number of Income Tax Returns (ITRs) filed till 31st December, 2023!
Few highlights:
👉 8.18 crore ITRs filed for AY 2023-24 upto 31.12.2023 which is 9% higher y-o-y.
👉1.60 crore audit reports and other forms filed.
👉AIS facility was used extensively, resulting in… pic.twitter.com/julWcfycLF
— Income Tax India (@IncomeTaxIndia) January 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)