भारतीय हवाई दल (Indian Air Force), महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने, भारतीय हवाई दलाच्या जनसंपर्क कार्यक्रमा अंतर्गत मुंबईत 12 जानेवारी ते 14 जानेवारी 24 या कालावधीत दुपारी 12 ते 1 या वेळेत मरीन ड्राइव्हवर हवाई कसरतींचे आयोजन करणार आहे. प्रामुख्याने जागरूकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल तसेच स्थानिक समुदाय यांच्यात सखोल संबंध वाढवणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा उद्देश आहे. चित्तवेधक कसरती आणि प्रात्यक्षिके, भारतीय हवाई दलाचे कौशल्य, क्षमता आणि व्यावसायिकतेचे दर्शन घडवतील. या कार्यक्रमात सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक (एस. के. ए. टी.) आणि 'सारंग' हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. फ्लायपास्ट आणि सुखोई-30 एमकेआय. द्वारे कमी उंचीवरील हवाई कसरती, 'आकाशगंगा' पथक आणि सी-130 विमानाद्वारे फ्रीफॉल आणि पॅराशूट प्रात्यक्षिकांसह विविध प्रकारच्या हवाई कसरतींचा समावेश असेल. (हेही वाचा: Vishwa Marathi Sammelan 2024: नवी मुंबईत 27 ते 29 जानेवारीदरम्यान विश्व मराठी संमेलनाचे आयोजन- Minister Deepak Kesarkar)
STORY | IAF to organise aerial display in Mumbai from January 12 to 14
READ: https://t.co/ZakBfyT6P0
(PTI File Photo) pic.twitter.com/MEbmAeQRFb
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)