असे म्हटले जाते की, जर तुम्ही प्राण्यांना दिवसातून दोन वेळा भाकरी दिली तर ते तुमच्यावर माणसांपेक्षा जास्त प्रेम करू लागतात. मनुष्य आणि प्राण्यामधील नाते हे अतिशय खास आणि अनोखे नाते समजले जाते. पाळीव प्राण्यांना फार लवकर त्यांच्या मालकांचा लळा लागतो. आता उत्तर प्रदेशातील (UP) अमरोहामधील एक माणूस आणि माकड यांच्यातील अशाच भावनिक बंधाची चर्चा सुरु आहे. एका माकडाला एक व्यक्ती रोज जेवण देत होती. या व्यक्तीच्या मृत्युनंतर हे माकड त्याच्या मृतदेहाशेजारी बसून रडताना दिसले.

हे माकड केवळ वृद्धाच्या मृतदेहाजवळच बसले नाही, तर कुटुंबीय आणि नातेवाईकांसह मृतदेहाला मिठी मारून 40 किमी अंतरावर असलेल्या गंगा घाटावर अंत्यसंस्कारामध्ये सामील झाले. चितेची आग शांत होईपर्यंत ते तिथेच बसून राहिले आणि नंतर लोक घरी परतायला लागल्यावर ते त्यांच्यासोबत परत आले. रामकुंवर सिंह हे गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या गच्चीवर या माकडाला जेवायला द्यायला. मात्र गेल्या मंगळवारी रामकुंवर यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर हे माकड रामकुंवर यांच्या मृतदेहाशेजारी बसून भरपूर रडले. अंत्यसंस्कारासाठी ते स्मशानभूमीतही गेले. माकडाचे हे प्रेम पाहून वृद्धाचे कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Live Fish Costume: मॉडेलने केला जिवंत माशांचा पोशाख परिधान करून रॅम्प वॉक; व्हिडिओ व्हायरल, नेटिझन्सकडून निषेध)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)