भारताने आयोजित केलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ने अनेक विक्रम केले. या विश्वचषकात भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक विक्रम केले, मात्र या विश्वचषकादरम्यान आणखी एक मोठा विक्रम झाला आहे. या विश्वचषकाचे सामने टिव्हीवर 518 मिलीयन लोकांनी तर डिजीटल माध्यमातून 295 मिलीयन लोकांनी हा सामना पाहिला आहे.  5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या या विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला खेळला गेलेला सामना विश्वचषकातील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)