Hathras Accident: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतिभानपूर येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला असावा, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या ठिकाणी भोले बाबांचा सत्संग सुरू होता, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर समारोपाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाचे अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हाथरस येथील फुलराई गावात ही घटना घडली. कार्यक्रमाच्या आयोजकांनी परवानगी घेतली होती, मात्र आयोजकांनी प्रशासनाला सांगितलेल्या संख्येपेक्षा जास्त लोक आले होते. (हेही वाचा: Religious Conversion: '...तर एक दिवस देशातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्याक होईल'; धर्मांतरावर अलाहाबाद उच्च न्यायालयाची मोठी टिपण्णी)
व्हिडिओ-
BREAKING
Several feared dead, many taken to hospitals after stampede at a religious event in Hathras, Uttar Pradesh.#Stampede #Hathras #UttarPradesh pic.twitter.com/tQYk3kkjYH
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 2, 2024
हाथरस से आई दुखद ख़बर, यहां रतिभानपुर में भोले बाबा के सत्संग के समापन के दौरान भगदड़ मच गई जिसमें कई लोगों की मौत हो गई। भगदड़ में कई महिलाएं, बच्चे और पुरुष दब गए।
15 महिलाओं और बच्चों को एटा मेडिकल कॉलेज ले जाया गया है। कई लोगों की मौत की है आशंका।#Hathras #UttarPradesh… pic.twitter.com/POGaFbX5gA
— UP Tak (@UPTakOfficial) July 2, 2024
यूपी में हाथरस के फुलरई गांव में भोले बाबा का सत्संग चल रहा था. जिसमें भगदड़ मच गई. अब तक की जानकारी के मुताबिक हादसे में 23 श्रद्धालुओं की मौत हो गई है.#uttarpradesh #hathras #satsang #breaking #news #hindi #hindinews #latestnews #latestupdates #abpnews #india pic.twitter.com/aP5FbGGirw
— ABP News (@ABPNews) July 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)