आज सुप्रीम कोर्टात द्वेषयुक्त भाषणाचे नियमन करण्याच्या निर्देशांसाठी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी झाली. न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठाने देशभरातील कथित द्वेषयुक्त भाषणाच्या विविध प्रकरणांच्या संदर्भात याचिकांवर विचार केला होता. मंगळवारी संध्याकाळी याचिकाकर्त्यांतर्फे वकील निजाम पाशा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्रात आणखी अनेक मोर्चे काढण्यात आले, ज्यामध्ये प्रक्षोभक भाषणे करण्यात आली. हे न्यायालयाचा अवमान आहे. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत पाशा म्हणाले की, येथे अशा 50 हून अधिक रॅली काढण्यात आल्या.

आजच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायलयाने सांगितले की, राजकारण आणि धर्म वेगळे झाल्यावर आणि राजकारण्यांनी धर्माचा राजकारणात वापर करणे बंद केल्यावर द्वेषयुक्त भाषणेही बंद होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)