Gyanvapi ASI Report: संपूर्ण देशाला उत्सुकता असलेल्या ज्ञानवापी मशिदीवरील एएसआय (ASI) चा अहवाल समोर आला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांना एएसआयचा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी पत्रकार परिषद घेतली. विष्णू जैन यांनी सांगितले की, अहवालानुसार या ठिकाणी पूर्वीपासून अस्तित्वात असलेली हिंदू रचना सापडली आहे. येथे एक फार मोठे भव्य हिंदू मंदिर होते. म्हणजेच सध्याची मशिदीची रचना तयार होण्यापूर्वी तेथे एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते.
एएसआयला आढळले आहे की, हिंदू मंदिराची रचना 17 व्या शतकात पाडण्यात आली होती आणि त्याचा वापर मशीद बांधण्यासाठी करण्यात आला होता. दोन तळघरांमध्ये हिंदू देवदेवतांचे अवशेष सापडले आहेत. एएसआयच्या अहवालात असे आढळून आले आहे की, मशिदीची पश्चिम भिंत हिंदू मंदिराचा भाग आहे. मंदिर पाडण्याचा आदेश आणि तारीख फारसीमध्ये दगडावर सापडली आहे. महामुक्ती मंडप असे लिहिलेला दगडही सापडला आहे. (हेही वाचा: Ayodhya Ram Mandir Timings: अयोद्धा राम मंदिर दर्शनासाठी आता रात्री 10 पर्यंत खुले राहणार; भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय)
#BREAKING | "...it can be said that there existed a large Hindu Temple prior to construction of existing structure (Mosque)", concludes Archaeological Survey of India's report on #GyanvapiMosque.
"western wall (of Mosque) is remaining part of a pre-existing Hindu temple" pic.twitter.com/nUIfQYiYio
— Live Law (@LiveLawIndia) January 25, 2024
#WATCH | Varanasi, Uttar Pradesh | Advocate Vishnu Shankar Jain, representing the Hindu side, gives details on the Gyanvapi case.
He says, "The ASI has said that there existed a large Hindu Temple prior to the construction of the existing structure. This is the conclusive… pic.twitter.com/rwAV0Vi4wj
— ANI (@ANI) January 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)