Govt Increase Intrest Rate For These Saving Schemes: छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने अल्पबचत योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीसाठी ही वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.20 टक्के झाला आहे. सुकन्या समृद्धीसोबतच सरकारने 3 वर्षांच्या ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. पूर्वी सरकार 3 वर्षांच्या ठेवींवर 7% व्याज देत होते, ते आता 7.1% झाले आहे. नवीन दर 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), 5 वर्षांची आवर्ती ठेव, मासिक उत्पन्न खाते योजना यांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. (हेही वाचा: India-Italy Agreement: भारत दरवर्षी 20,000 हून अधिक कामगार इटलीला पाठवणार; मंत्रिमंडळाने कराराला दिली मंजुरी)
Ministry of Finance @FinMinIndia revises the rates of interest on various Small Savings Schemes for the fourth quarter of financial year 2023-24 starting from 1st January, 2024 and ending on 31st March, 2024. pic.twitter.com/VWUEcAQaOt
— All India Radio News (@airnewsalerts) December 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)