देशातील ज्या प्रवाशांनी 3 आणि 4 मे रोजी गो फर्स्ट (GoFirst) एअरलाइन्सची तिकिटे बुक केली आहेत त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. गो फर्स्टने 3 आणि 4 मे रोजीची उड्डाणे रद्द केली आहेत. तेल कंपन्यांची थकबाकी भरू न शकल्याने विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, एका तेल विपणन कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गो फर्स्ट कॅश आणि कॅरी मोडवर काम करत आहे. म्हणजेच, विमान कंपनीला दररोज उड्डाण करायच्या संख्येनुसार हवाई इंधनाचे पैसे द्यावे लागतात. एअरलाइन्सनी हे मान्य केले आहे की, पेमेंट न केल्यास उड्डाणे ठप्प होऊ शकतील. विमान कंपनीला रोख रकमेची तीव्र टंचाई आहे. पेट्रोलियम कंपन्यांची थकबाकी न भरल्यामुळे, गो फर्स्ट  एअरलाइनने 3 आणि 4 मे रोजीची उड्डाणे रद्द केली आहेत. (हेही वाचा: मार्गन स्टॅनली बँक पुन्हा करणार कर्मचारी कपात, 3000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)