राजधानी दिल्ली येथे 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान जी 20 शिखर परिषद होणार आहे. त्यामुळे दिल्लीत काही निर्बंध लागू केले आहेत. उत्तर रेल्वेने सोमवारी सांगितले की जी20 मुळे 200 हून अधिक गाड्या रद्द होणार आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांचे मार्ग आणि टर्मिनलही बदलण्यात येणार आहेत. अशात एअर इंडियानेही आपल्या प्रवाशांना सतर्क केले आहे.

जी20 शिखर परिषदेमुळे 7 ते 11 सप्टेंबर 2023 या कालावधीत दिल्लीत लादलेल्या प्रवासी निर्बंधांदरम्यान, एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी शेअर केली आहे. एअर इंडियाने म्हटले आहे, की, ‘7 ते 11 सप्टेंबर 2023 या दरम्यान दिल्लीला जाण्यासाठी किंवा तेथून बाहेर पडण्यासाठी कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना इतर शुल्क न आकारता त्यांच्या प्रवासाची तारीख किंवा फ्लाइट बदलण्याची संधी देण्यात येत आहे.' म्हणजेच प्रवासी 7 ते 11 सप्टेंबर 2023 दरम्यान असलेल्या त्यांच्या प्रवासाची तारीख बदलत असतील, तर त्यांना इतर कोणतेही शुल्क लागू न करता केवळ पुनर्निर्धारित फ्लाइटच्या भाड्यातील फरक भरून पुढील तारखेस प्रवास प्रवास करता येणार आहे. (हेही वाचा: New IRCTC Customer Care Helpline: आयआरसीटीसी कडून नवा हेल्पलाईन नंबर जारी; एकाच नंबर वर मिळणार देशभर मदत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)