Fake News Alert: सरकारी कर्मचारी पोस्टल बॅलेटच्या मदतीने मतदान करू शकणार नसल्याचा वायरल मेसेज खोटा; केंद्रीय निवडणूक आयोगाने केला खुलासा

जे सरकारी कर्मचारी निवडणूकीच्या कामात असतील त्यांना पोस्टल बॅलेटने मतदान करता येणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Fake News Alert: सरकारी कर्मचारी पोस्टल बॅलेटच्या मदतीने मतदान करू शकणार नसल्याचा वायरल मेसेज खोटा; केंद्रीय निवडणूक आयोगाने केला खुलासा
Fake News Alert | Twitter

देशात सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. 19 एप्रिल दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशात आता निवडणूकीच्या काळात अनेक खोट्या बातम्या देखील वेगात पसरतात. मात्र खोट्या बातम्यांना रोखण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच फॅक्ट चेक करून सत्य समोर आणलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप वर यंदाच्या निवडणूकी मधून पोस्टल बॅलेट बंद केल्याचा दावा करण्यात आला आहे.  पण केंद्रीय निवडणूक आयोगाने हा मेसेज खोटा असल्याचं सांगत जे सरकारी कर्मचारी निवडणूकीच्या कामात असतील त्यांना पोस्टल बॅलेटने मतदान करता येणार असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2024 10:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).