Cyclone Forecast Alert: हवामान विभागाकडून नुकतीच मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर करण्यात आली. आता या महिन्यासाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. अहवालानुसार, गुरुवार, 23 मे पर्यंत बंगालच्या उपसागरात एक तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ 23 ते 26 मे दरम्यान ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्राला प्रभावित करेल. चक्रीवादळाचा इशारा लक्षात घेता, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वरील तीन राज्ये विशेषतः गुजरात आणि मुंबईसाठी हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या जोर धरत असलेले चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल, ज्यामुळे देशाच्या विस्तृत भागावर परिणाम होईल. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने अद्याप या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. दुसरीकडे, हवामान अंदाजानुसार, आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा: Monsoon Update: मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात होणार दाखल)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)