शतकातील सर्वात शक्तीशाली वादळ 'चिडो'ने फ्रेंच शहरात मायोटमध्ये मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केली आहे. या चक्रीवादळाचा मेयोतमधील मामूदजौसह अनेक भागांवर वाईट परिणाम झाला. चक्रीवादळामुळे घरे, सरकारी इमारती आणि रुग्णालयांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वीज व पाणीपुरवठा खंडित झाला आहे. 'ॲटम बॉम्ब नंतरची परिस्थिती' असे भयावह असे वर्णन मेयोत जनतेने केले आहे. दरम्यान चिडो चक्रीवादळानंतर मेयोटच्या फ्रेंच प्रदेशात किमान जण 20 ठार झालेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)